AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Breaking | 2 दहशतवाद्यांना ATS नं केली अटक, दोन्ही दहशतवादी अल कायदा संघटनेशी संबंधित

| Edited By: | Updated on: Jul 11, 2021 | 8:19 PM
Share

उत्तर प्रदेश एटीएसने लखनऊमधील काकोरी भाग सील केला आहे. एटीएसला त्या भागात अतिरेकी असल्याची माहिती मिळाली होती. एटीएसनं दोन अतिरेक्यांना ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.

लखनऊ : उत्तर प्रदेश एटीएसने लखनऊमधील काकोरी भाग सील केला आहे. एटीएसला त्या भागात अतिरेकी असल्याची माहिती मिळाली होती. एटीएसनं दोन अतिरेक्यांना ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. परिसरात बाँम्ब स्कॉडदेखील दाखल झालं होतं. एटीएसला एका घरात कुकर बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली होती. एटीएसकडून यासंदर्भात अधिकृतरित्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. एटीएसनं हा परिसर सील केला असून त्या परिसरात कोणालाही जाण्यास मनाई करण्यात आली आहे. परिसरातील कुटुबांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. एटीएसकडून अधिक चौकशी सुरु आहे. (ATS arrested two Al-Qaeda terrorist from Kakori of Lucknow in UP)

दोन अतिरेक्यांना अटक

एटीएसनं या भागातून काही स्फोटक पदार्थ जप्त केल्याची माहिती आहे. एटीएसनं या ठिकाणाहून दोन अतिरेक्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्यापैकी एक जण हा जुम्मूमधील दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय आहे.

एटीएस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद विरोधी पथकानं अल-कायदा संघटनेच्या दोन अतिरेक्यांना अटक केली आहे. या दोन्ही अतिरेक्यांना पाकिस्तानातील दहशतवाद्यांकडून सूचना मिळत होत्या अशी माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही अतिरेक्यांची चौकशी सुरु असून सर्च ऑपरेशन सुरु आहे. एटीएस दोघांशिवाय आणखी अतिरेकी त्या भागात लपले आहेत का? याचा शोध घेत आहे.

वाहतूक थाबंवली

उत्तर प्रदेश पोलिसांनी या मार्गावरुन जाणारी वाहतूक देखील थांबवली आहे. सर्च ऑपरेशन सुरु असेपर्यंत या भागातील वाहतूक बंद राहील, असं देखील कळवण्यात आलं आहे. लखनऊमध्ये काकोरी हा दाट लोकसंख्येचा भाग आहे. ही घटना समोर आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

5 वाजता पत्रकार परिषद

उत्तर प्रदेश पोलिसांच्या वतीनं सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेण्यात येईस. या संदर्भात त्यावेळी अधिक माहिती दिली जाईल, असं सागण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या:

नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिपदासाठी शुभेच्छा दिल्या का? राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

मुलगी तयार, तिच्या घरचे तयार, बाहेरचे म्हणतायत ‘लव्ह जिहाद’, पुण्यात जोडप्याला लग्नाआधीच धमक्या!

(ATS arrested two Al-Qaeda terrorist from Kakori of Lucknow in UP)

Published on: Jul 11, 2021 08:19 PM