देहूगावं (Pune) मधील जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिरत षटतीला एकादशी (Shattila Ekadashi) निमित्ताने आकर्षक सजावट करण्यात आलीय. विविध आकर्षण फुलांनी मुख्य गाभाऱ्यामधील विठ्ठल-रुक्मिणी (Vitthal) यांचे रूप सजलेले पाहून मन आनंदी होत आहे. सुवासिक फुलांच्या सुगंधाने मंदिर परिसर दरवळून गेलाय. यात मुख्यतः तुळस,जरबेरा,गुलाब,सोन चाफा,मोगरा,जाई जुई आणि झेंडूच्या फुलांचा सुंदर मिलाफ पहायला मिळाला.