तिरपी बस चालवणाऱ्या बेजबाबदार बसचालकावर गुन्हा दाखल

सेंट्रल बॅलन्स गेल्यामुळे तिरपी झालेली बस तशीच दामटवणाऱ्या एसटी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद रोडवरील घटनेचा व्हिडीओ नुकताच उजेडात आला होता. तिरपी बस बेदरकार चालवल्या प्रकरणी धुळे आगाराचे बस चालक रमेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेंट्रल बॅलन्स गेल्यामुळे तिरपी झालेली बस तशीच दामटवणाऱ्या एसटी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद रोडवरील घटनेचा व्हिडीओ नुकताच उजेडात आला होता. तिरपी बस बेदरकार चालवल्या प्रकरणी धुळे आगाराचे बस चालक रमेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिरप्या बसचा धक्का लागून बाईक पडल्याचं व्हिडीओमध्ये दिसत होतं. अशाचप्रकारे काही दुचाकी चालक जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. जखमी बाईकचालक साहेबसिंग कवाळे यांच्या तक्रारीवरुन रमेश पाटलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादच्या छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI