Sanjay Raut Full Press | भाजपच्या दहशतीला घाबरत नाही इथे लोकशाही आहे, ट्रम्पशाही नाही; राऊतांचा भाजपवर घणाघात
बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे यांना समजावण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण गेले होते, या पार्श्वभूमीवर राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली. राऊत यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर थेट निशाणा साधत, “ते स्वातंत्र्य चळवळीतील सेनानी आहेत का?” असा सवाल केला.
बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे यांना समजावण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण गेले होते, या पार्श्वभूमीवर राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली. राऊत यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर थेट निशाणा साधत, “ते स्वातंत्र्य चळवळीतील सेनानी आहेत का?” असा सवाल केला. तसेच, चव्हाण यांच्यावर पैशांचे वाटप केल्याचे आरोप कोकणासह विविध ठिकाणी होत असल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी राऊत यांनी गंभीर आरोप करत म्हटले की, “रवींद्र चव्हाण फाईल घेऊन जातात आणि माघार घ्या, अन्यथा नोटीस पाठवू, कारखान्यावर कारवाई करू अशा प्रकारच्या धमक्या देतात.” या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पुढे बोलताना राऊत म्हणाले की, सध्याच्या राजकारणात संघर्ष केल्याशिवाय काहीही मिळत नाही. “जे धमक्यांना घाबरतात ते मागे हटतात. पण आम्ही भाजपला किंवा त्यांच्या दहशतीला घाबरत नाही,” असं त्यांनी ठणकावून सांगितलं. “ही लोकशाही आहे, ट्रम्पशाही नाही. मग घाबरण्याचे कारण काय?” असा सवाल करतानाच त्यांनी भाजपवर थेट हल्ला चढवला. या वक्तव्यामुळे बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
Published on: Apr 07, 2026 12:12 PM
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ

