Baramati Election | बारामतीतून उमेदवारी अर्ज मागे घ्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सपकाळांना फोन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय हालचाली जोर धरत आहेत. सर्व पक्ष बिनविरोध निवडणूक व्हावी, अशी भूमिका मांडत असताना, भाजपनेही या मागणीला पाठिंबा दिला होता. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना थेट फोन करून सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीसाठी काँग्रेसकडून उमेदवार मागे घ्यावा, अशी विनंती केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय हालचाली जोर धरत आहेत. सर्व पक्ष बिनविरोध निवडणूक व्हावी, अशी भूमिका मांडत असताना, भाजपनेही या मागणीला पाठिंबा दिला होता. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना थेट फोन करून सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीसाठी काँग्रेसकडून उमेदवार मागे घ्यावा, अशी विनंती केली आहे, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका काय राहील, हे पाहणे महत्त्वाचे ठरत आहे. या निर्णयावरून बारामती पोटनिवडणुकीत शेवटच्या क्षणी राजकीय ताण वाढण्याची शक्यता आहे.
Published on: Apr 09, 2026 12:30 PM
Follow Us
