Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baramati Supriya Sules : फक्त बारामती किंवा महाराष्ट्रातच नाहीतर सातासमुद्रापारही सुप्रिया सुळेंच्या विजयाचा जल्लोष

Baramati Supriya Sules : फक्त बारामती किंवा महाराष्ट्रातच नाहीतर सातासमुद्रापारही सुप्रिया सुळेंच्या विजयाचा जल्लोष

| Updated on: Jun 06, 2024 | 4:54 PM

Supriya Sules Baramati Lok Sabha Victory Celebrated In New Yorks Times Square आता केवळ बारामती किंवा फक्त महाराष्ट्रातच नाहीतर सातासमुद्रापारही सुप्रिया सुळेंच्या लोकसभा निवडणुकीतील विजयाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर सुप्रिया सुळे आणि शरद पवारांचे बॅनर्स झळकले

बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गट राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहे. सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गट राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा तबब्ल १ लाखांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. हाय व्होल्टेज बारामती मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं. बारामती लोकसभा मतदार संघामध्ये येणार सहा विधानसभा मतदारसंघांमधील आकडेवारी पाहिली तर पाच मतदारसंघात त्यांना लीड मिळालं आहे. यानंतर राज्यभरात सगळीकडे सुप्रिया सुळेंचे अभिनंदन करणारे बॅनर कार्यकर्त्यांकडून लावण्यात आल्याचे पाहायला मिळाले. अशातच आता केवळ बारामती किंवा फक्त महाराष्ट्रातच नाहीतर सातासमुद्रापारही सुप्रिया सुळेंच्या लोकसभा निवडणुकीतील विजयाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर सुप्रिया सुळे आणि शरद पवारांचे बॅनर्स झळकल्याचे पाहायला मिळतंय.

Published on: Jun 06, 2024 04:54 PM