Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Satish Bhosale Updates : खोक्या भोसले शिरूरला दाखल; थोड्याच वेळात न्यायालयात हजर करणार

Satish Bhosale Updates : खोक्या भोसले शिरूरला दाखल; थोड्याच वेळात न्यायालयात हजर करणार

| Updated on: Mar 14, 2025 | 1:29 PM

Satish Bhosale Crime News : आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आणि शिरूर मारहाण प्रकरणातील आरोपी खोक्या उर्फ सतीश भोसळे याला घेऊन पोलिस शिरूरच्या सत्र न्यायालयात दाखल झाले आहेत.

शिरूर मारहाण प्रकरणातील आरोपी आणि सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसलेला घेऊन पोलिस शिरूर सत्र न्यायालयात दाखल झालेले आहे. त्याला थोड्याचवेळात न्यायमूर्ती अक्षय जगताप यांच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. शिरूर मारहाण प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतीश भोसलेच्या शोधासाठी बीड पोलिसांचे पथक रवाना झाले होते. त्यानंतर त्याला उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मधून अटक करण्यात आली. आज सकाळी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर त्याला आणण्यात आलं. त्यानंतर तिथून शिरूर येथे आणलं गेल. आता त्याला शिरूर सत्रन्यायालयात हजर करण्यात येणार आहे. न्यायालयाकडून काय निर्णय घेतला जातो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Published on: Mar 14, 2025 01:28 PM