Bhiwandi : तरच मामाची बॉडी नेणार, भिवंडीत BJP नेत्याची भररात्री धारदार शस्त्राने हत्या, नातेवाईकांचा आक्रोश, नेमकं घडलं काय?
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याची माहिती मिळतेय. नेमकं घडलं काय बघा व्हिडीओ?
भिवंडीतील भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी यांची कार्यालयातच धारदार शस्त्रांनी हल्ला करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेत त्यांच्यासोबत असलेले त्यांचे सहकारी तेजस तांगडी यांचाही मृत्यू झाला आहे, तर आणखी एक सहकारी जखमी झाल्याची माहिती मिळतेय. भिवंडीतील या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून, जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांनी नकार दिला आहे. भिवंडी तालुक्यातील खारबाव-चिंचोटी रस्त्यावरील खार्डी गावात, प्रफुल्ल तांगडी यांच्या जे.डी.टी. इंटरप्रायझेस कार्यालयात ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सुमारे ११ वाजताच्या सुमारास भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. चार ते पाच अज्ञात हल्लेखोरांनी हा हल्ला केला. एक वर्षापूर्वी देखील प्रफुल्ल तांगडी यावर हल्ला करण्यात आला होता. व्यावसायिक वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, प्रफुल्ल तांगडी यांच्या कुटुंबीयांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

