Chandrakant Patil : राज ठाकरे चांगले नेते पण जरा समजून घेतलं पाहिजे आणि… हिंदी सक्तीवरून भाजपच्या बड्या नेत्यानं टोचले कान
राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शाळांमधील इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी विषय लागू करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाचा विरोध केला. तर महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्तीची नसायला हवी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
हिंदी भाषा सक्तीची नाही, तिसरी भाषा म्हणून हिंदी हा पर्याय आहे, असं वक्तव्य भाजपाचे नेते तथा उच्चं व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. राज ठाकरे मोठे नेते आहेत. त्यांनी समजून घेतलं पाहिजे. राज ठाकरे हे खूप चांगले नेते आहेत. ते खूप गोष्टी परखडपणे मांडतात. पण या विषयात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बसून ही भूमिका समजून घेण्याची आवश्यकता आहे, असं म्हणत हिंदी सक्तीवरून चंद्रकांत पाटलांनी राज ठाकरेंना सल्ला दिल्याचे पाहायला मिळत आहे. पुढे ते असेही म्हणाले, हिंदी भाषेची सक्ती केली आहे, लोकांमध्ये हा गैरसमज आहे. अशी एखादी तिसरी भाषा देशभरात जाण्यासाठी, देशभरातील गोष्टी समजून घेण्यासाठी उपयोगी असेल तर विरोध करण्याचं कारण नाही. त्यामुळे सक्तीचा शब्द कुठून आला हेच कळत नसल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण! अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले

मनसेच्या शिबिरात युती बाबत राज ठाकरेंचं मोठं विधान

मुलींच्या शरीरावरून कमेंट्स; पोलीस भरती तयारी करणाऱ्यांना मारहाण अन्..

आदित्य ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल, वांद्रे जमीन पुनर्विकासावरून सवाल
