Maharashtra Election 2026 : रूदाली तर उद्या.. आता प्रॅक्टिस सुरू, पालिका निवडणुकीवरून चित्रा वाघ यांची ठाकरेंना टोलेबाजी
चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर माझा पराभव, माझी स्क्रिप्ट सुरू या वक्तव्यावरून टीका केली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनीही ठाकरेंना लक्ष्य करत म्हटले आहे की, मुंबईकर विकासाच्या राजकारणाला पाठिंबा देत आहेत. आगामी निवडणुकीतील अपेक्षित पराभवासाठी उद्धव ठाकरे स्पष्टीकरणे तयार करत असल्याचा आरोप वाघ आणि साटम यांनी केला आहे.
चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर माझा पराभव, माझी स्क्रिप्ट सुरू या वक्तव्यावरून तीव्र टीका केली आहे. वाघ यांच्या मते, उद्धव ठाकरे कितीही रडले तरी मुंबईकर आता फसणार नाहीत. मुंबईकर फसले नाहीत म्हणूनच त्यांचे रडणे सुरू असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले. आगामी निवडणुकीतील पराभव स्पष्ट दिसत असल्याने उद्धव ठाकरे कव्हर फायरिंग करत आहेत, असा दावा त्यांनी केला.
तर मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनीही यासंदर्भात ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. साटम यांच्या मते, उद्धव ठाकरे त्यांच्या पूर्वीच्या माझं कुटुंब, माझी जबाबदारी या यशानंतर आता माझा पराभव, माझी स्क्रिप्ट या तयारीत आहेत. उद्याच्या पराभवानंतर स्पष्टीकरण देण्यासाठी काहीतरी कारण हवे, याची तयारी ठाकरे करत असल्याचा साटम यांचा आरोप आहे. त्यांनी स्पष्ट केले की, मुंबईतील मराठी माणसांनी आणि सर्व मुंबईकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलेल्या विकासाच्या राजकारणाला भरभरून आशीर्वाद दिला आहे. मुंबईच्या भविष्याच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक दिवस असल्याचेही साटम यांनी नमूद केले.
रूदाली तर उद्या आता प्रॅक्टिस सुरू, चित्रा वाघ यांची ठाकरेंना टोलेबाजी
भांडूपच्या आदर्श केंद्राबाहेर शिंदे सेना आणि ठाकरे सेना भिडले
शाई पुसली चूक कोणाची? निवडणूक आयोगानं मतदारांवर फोडलं खापर
शाई पुसली जाण्यावरून मोठा वादंग, निवडणूक आयोगानं सांगितला सगळा इतिहास

