भाजप हा देशात सर्वात घातक पक्ष : Imtiyaz Jaleel
महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) तीन चाकांसोबत एमआयएमचंही चौथं चाक जोडा, तिची मोटरकार करा.. बघा कशी चालतेय… अशी ऑफर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी महाविकास आघाडीला दिली आहे.
महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) तीन चाकांसोबत एमआयएमचंही चौथं चाक जोडा, तिची मोटरकार करा.. बघा कशी चालतेय… अशी ऑफर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी महाविकास आघाडीला दिली आहे. या वक्तव्यामुळे शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन साकारलेल्या महाविकास आघाडीत एमआयएम शामिल झाले तर काय काय घडू शकते, यावर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या तिन्ही पक्षांची विचारसरणी आणि धोरणं वेगवेगळी आहेत. त्यातच शिवसेनेचा बाणाही पूर्णपणे एमआयएमच्या विरोधात आहे. तरीही महाविकास आघाडीला एमआयएमने अशी ऑफर दिल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी चर्चेची लाट आली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादीचे नेते तथा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची काल एक बैठक पार पडली. यात खासदार जलील यांनी आम्ही महाविकास आघाडीसोबत येण्यास तयार आहोत, असा प्रस्ताव दिला आहे.
