Chandrashekhar Bawankule | नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बावनकुळे सर्व पक्षांच्या नेत्यांशी करणार चर्चा

Chandrashekhar Bawankule | नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बावनकुळे सर्व पक्षांच्या नेत्यांशी करणार चर्चा

| Updated on: May 19, 2026 | 1:17 PM

विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 16 जागांसाठी निवडणुकीची तयारी सुरू असताना नागपूर मतदारसंघाकडे विशेष लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमधील निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती दिली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले की, नागपूर विधानपरिषदेची स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली जाणार आहे. यासाठी ते स्वतः पुढाकार घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नागपूरच्या राजकीय परंपरेनुसार सामंजस्यातून निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वास व्यक्त करत बावनकुळे यांनी सर्व पक्ष या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद देतील, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून नागपूरमधील बिनविरोध निवडणुकीच्या शक्यतेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच राज्यात सध्या पेट्रोल-डिझेल टंचाईसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचाही उल्लेख त्यांनी केला. निवडणुकीदरम्यान होणारा खर्च, यंत्रणेवरील ताण आणि सध्याची आपत्तीजन्य परिस्थिती लक्षात घेता ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सर्व पक्षांना विनंती करणार असल्याचं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, बावनकुळेंच्या या भूमिकेमुळे नागपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Published on: May 19, 2026 01:16 PM
Follow Us