Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, चंद्रशेखर बावनकुळेंनी मांडले सविस्तर मुद्दे

विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, चंद्रशेखर बावनकुळेंनी मांडले सविस्तर मुद्दे

| Updated on: Jun 14, 2024 | 5:25 PM

Chandrasekhar Bawankule on Assembly Election 2024 : गरीब कापण्याच्या योजना तळागाळात पोहोचविण्यासाठी भाजप काम करतंय. महायुतीचे उमेदवार विधानसभेत निवडून आणण्यासाठी आजची बैठक... मोदींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाने काम सुरू केलं आहे. त्यांच्या अभिनंदनाचा आणि विकसित भारताच्या संकल्पाबद्दल ठराव मांडण्यात आला

भाजप महाराष्ट्र आणि मुंबईच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज पार पडली. यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांश बोलताना विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन कसा आहे हे सांगितले. ‘मोदींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाने काम सुरू केलं आहे. त्यांच्या अभिनंदनाचा आणि विकसित भारताच्या संकल्पाबद्दल ठराव मांडण्यात आला. गरीब कापण्याच्या योजना तळागाळात पोहोचविण्यासाठी भाजप काम करतंय. महायुतीचे उमेदवार विधानसभेत निवडून आणण्यासाठी आजची बैठक आहे’, असे त्यांनी सांगितले. तर फडणवीसांनी आम्हाला आश्वस्त केलं की आपली संघटना महाराष्ट्रातील जनतेला मविआच्या मायावी शक्तीतून, खोट्या नरेटिव्हमधून बाहेर काढणार आहे. मोदींनी संविधान सर्वोच्च असल्याचं अधोरेखित केलं. काँग्रेस आणि मित्रपक्षांनी निर्माण केलेलं भय दूर करण्याचं काम मोदींनी केलं आहे. आम्ही आदिवासी, मागास लोकांमध्ये जाणार आहोत. महिलांना पैसे देऊ काँग्रेसने म्हटलं होतं पण तसं झालं नाही. पण आम्ही समाजाच्या शेवटच्या व्यक्तिपर्यंत विकास पोहोचवणार. 48 नेते लोकसभेत जाणार. जनतेचा कौल मान्य आहे. पुन्हा एकदा जनतेला सोबत घेऊन महाराष्ट्र जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Published on: Jun 14, 2024 05:25 PM