संजय राऊत भिXXXX, गोपीचंद पडळकरांचा जहरी भाषेत पलटवार, कोणत्या टीकेला दिलं प्रत्युत्तर?
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी तब्बल 12 उमेदवार रिंगणात आहेत. तर यावरूनच विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करताना दिसताय. विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी पक्ष हे सत्तेचा दुरूपयोग करत आहेत, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. यावर प्रतिक्रिया देत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पलटवार केला आहे.
विधानपरिषदेची आज निवडणूक पार पडत आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी तब्बल 12 उमेदवार रिंगणात आहेत. तर यावरूनच विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करताना दिसताय. अशातच विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी पक्ष हे सत्तेचा दुरूपयोग करत आहेत, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. यावर प्रतिक्रिया देत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पलटवार केला आहे. ‘संजय राऊत हा एक नंबरचा भिXXXX माणूस आहे. तो जसा पाहिजे तसं बोलतो. एकीकडे म्हणायचे आम्ही संविधानाला धरून आहोत ते वाचवतोय तर दुसरीकडे संविधानात जे नियम आहेत ज्यात हक्क अधिकार यांचे संरक्षण आहे. त्यातूनच गणपत गायकवाड यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत हक्क बजावला आहे. यापूर्वीही अशा निवडणुका झाल्या आहेत. लोकं जेलमध्ये राहून निवडणूक लढवतात इतकंच नाहीतर ते जिंकूनही येतात.’, असं स्पष्टपणे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.
