Nitesh Rane : मुंबईकरांसाठी ठाकरे कुटुंबीयांनी काय दिवे लावले? ते कुटुंब महाराष्ट्रातलं…. नितेश राणेंचा प्रहार
नितेश राणे यांनी ठाकरे कुटुंबाच्या महाराष्ट्रातील अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उद्धव ठाकरेंना मत म्हणजे जिहादाला मत असे म्हणत त्यांनी मुंबईसाठी ठाकरे कुटुंबाच्या योगदानावर टीका केली. मुंबईत हिरवंकरण आणि सर तन से जुदाच्या घोषणांचा संदर्भ देत, आगामी निवडणुकीत जनता हिंदुत्वाच्या विचाराने मतदान करेल असा विश्वास राणेंनी व्यक्त केला.
भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे कुटुंबाच्या महाराष्ट्रातील अस्तित्वावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ठाकरे कुटुंब हे महाराष्ट्रात तरी आहे का? असा सवाल करत, मुंबईसाठी त्यांनी काय दिवे लावले असाही त्यांनी उपरोधिक प्रश्न विचारला. आम्ही मुळापर्यंत पोहोचायचं का? मूळ बाहेर काढायचं का? मग आम्हालाही तोंड बाहेर उघडायला लागेल, असा इशाराही राणे यांनी दिला. नितेश राणे यांच्या मते, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबईकरांसाठी विशेष काही केले नाही. उलट, बांगलादेशी आणि रोहिंग्यांची संख्या वाढवली, तसेच मुंबईचे हिरवं हिरवंकरण केले, असा आरोप त्यांनी केला.
लोकसभेच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांनी हिरवा गुलाल उधळत सर तन से जुदा आणि पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिल्याचा संदर्भ देत, मुंबईची जनता हे विसरलेली नाही असे राणे म्हणाले. उद्धव ठाकरेंना दिलेले मत म्हणजे जिहादाला मत आणि काँग्रेसला दिलेले मत म्हणजे मुस्लिम लीगला मत असे स्पष्ट मत राणे यांनी मांडले. येत्या 15 तारखेला मुंबईची जनता आणि 29 महापालिकेची जनता हिंदुत्वाचा विचार नजरेसमोर ठेवून मतदान करेल आणि 16 तारखेला सगळं भगवमय होईल, असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला.
सामंतांच्या बॅगेची आयोगाकडून तपासणी, बॅगेत काय-काय? मंत्र्यानच सांगितल
...मग आम्ही काय बांगड्या भरल्यात का? अजितदादांवर ऐकरी भाषा अन्...
नितेश राणेंचे व्हिडीओ 11 तारखेला व्हायरल करू, सचिन अहिर यांचा निशाणा
मी टोपी फेकली, राऊतांनी दोघांच्या डोक्यात घातली... फडणवीसांचा हल्लाबोल

