Buldhana : बुलढाण्याचा ‘गुगल बॉय’, 2 मिनिटांत 71 देशांची राजधानी तोंडपाठ, ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद
क्षितिजच्या या जागतिक विक्रमामुळे डोणगावसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे.. सोशल मीडियावर त्याच्या यशाचा व्हिडिओ व्हायरल होत असून सर्वच स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
नदीला पूर यावा तशी बुद्धिमत्ता आणि संगणकापेक्षाही वेगवान स्मरणशक्ती लाभलेल्या मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील एका चिमुकल्याने देशपातळीवर जिल्ह्याचा झेंडा फडकवला आहे. अवघ्या २ वर्ष ८ महिने वयाच्या क्षितिज विशाल बाजड याने जगातील ७१ देशांच्या राजधानींची नावे अवघ्या २ मिनिटे ३० सेकंदात सांगून ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरले आहे. क्षितिजच्या या अफाट बुद्धिमत्तेची दखल घेत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने त्याला अधिकृत प्रमाणपत्र, मेडल आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविले आहे. ज्या वयात मुले नीट बोलू शकत नाहीत, त्या वयात क्षितिजला जगाचा नकाशा आणि विविध देशांच्या राजधानी तोंडपाठ आहेत. त्याच्या या विलक्षण प्रतिभेने तज्ज्ञही थक्क झाले आहेत.
क्षितिजची आई सोनाली आणि वडील विशाल बाजड यांनी त्याच्यातील हे सुप्त गुण ओळखले. खेळाच्या वयात त्याला रटाळ अभ्यासाऐवजी रंजक पद्धतीने माहिती देण्यास सुरुवात केली. आई- वडिलांच्या मार्गदर्शनाखाली क्षितिजने अवघ्या काही दिवसातच हा कठीण टप्पा पार केला. त्याच्या या यशात त्याच्या जिद्दीचा आणि पालकांच्या कष्टाचा मोठा वाटा आहे.
मुंबईसाठी प्रकाशित केलेल्या ठाकरे बंधूंच्या वचननाम्यात नेमकं काय?
चंद्रपूरनंतर अमरावतीत फडणवीसांचा रोड शो; भाजप नेत्यांचा सहभाग
बडोद्याचं साम्राज्या मराठेशाहीचं, गुजराती महापौर कसे? ठाकरेंचा सवाल
...तर निवडणुका नकोत; सोलापूर प्रकरणी अमित ठाकरे संतापले

