Video | ‘मंडल आयोगाला चॅलेंज करणार, अरे बाबा मंडल आयोग गेला तर….’ भुजबळ यांची जरांगे यांच्यावर टीका
ओबीसींच्या नगर येथील एल्गार परिषदेत ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर तिखट शब्दात टीका केली. मनोज जरांगे पाटील यांना अध्यादेश म्हणजे काय कळत नाही ? नोटीफीकेशनचा मसुदा म्हणजे काय ? कळत नाही. मराठा समाजातील विचारवंत काय करीत आहेत ? असा सवाल भुजबळांनी यावेळी केला.
नगर | 3 फेब्रुवारी 2024 : ओबीसीच्या एल्गार मेळाव्यात ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांनी मराठ्यांना आरक्षण जरुर द्यावे पण आमच्या ताटातील नको असे पुन्हा स्पष्ट केले. आम्ही मराठ्यांच्या आरक्षणाविरोधात नाही, परंतू मनोज जरांगे ओबीसीतूनच आरक्षण पाहीजेत असे हट्टाला पेटले आहेत. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला घाबरुन सरकार लगेच जीआर काढीत आहे. रात्री तीन तीन जरांगे यांच्या सभा होत आहेत. त्यांच्याविरोधात कोणी कारवाई करायला मागत नाही. कारण काय तर मराठ्यांच्या मतदानाला सर्वजण घाबरत आहेत. आता आंध्रप्रदेशात जातीय गणना होणार आहे. बिहारमध्ये जातीय गणना झाली. तेथे ओबीसीचा आकडा मोठा आहे. त्यामुळे ओबीसींनी एकजूट दाखवायला हवी असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे यांच्या मागे सर्व वाहवत चालले आहेत. त्यांनी बजेटमधून आरक्षण जाहीर करा असे सांगून मोठा जोक केला. पण त्यांना कोणी सांगायला तयार नाही की असे बजेटमधून आरक्षण जाहीर करता येत नाही. लेकाला अध्यादेश म्हणजे काय ? नोटीफिकेशनचा मसुदा म्हणजे काय कळत नाही. आता तर काय म्हणे मंडल आयोगाला चॅलेंज करणार, अरे बाबा मंडल आयोग गेला तर कुणबी आरक्षण राहील का ? असा शाब्दीक हल्ला भुजबळ यांनी नगर येथील एल्गार सभेत जरांगे पाटील यांच्यावर चढवला.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

