साहेब आता निर्णय घ्या… नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा उमेदवारीमुळे थेट विनंती; काय घडतंय?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवारीवरून राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली होती सुनेत्रा पवारांनी राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे राज्यसभेसाठी इच्छुक असल्याची माहिती समोर आली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून अचानक राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अचानक राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले. यावर आता स्वतः छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्ट सांगितले की, आपल्याला लोकसभा आणि राज्यसभेत जाण्याची इच्छा होती. यापूर्वीही अनेकदा संधी जवळ आली पण मिळाली नाही. मात्र हे प्रकरण आता इतक्यावरच थांबलं नसून मोठं रुप घेत आहे. भुजबळांचे समर्थकांनी तीव्र नारीजी व्यक्त केली आहे. अनेक ठिकाणी थेट बॅनरबाजी करण्यात आली आहे. अनेक बॅनरवर साहेब आता निर्णय घ्या असं दिसून आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुजबळांनी राज्यसभेवर जाताना आपल्या मंत्रिपदाची जबाबदारी समीर भुजबळ यांच्याकडे देण्याची इच्छा व्यक्त केल्याचे बोलले जात होते. यानंतर विविध राजकीय स्तरावर चर्चा सुरू झाली होती.