CJP चं आंदोलन पेटलं! मंत्री जे. पी. नड्डा यांच्याशी भेट, दिल्लीत मोठ्या हालचाली
दिल्लीतील जंतर-मंतर येथे CJP (कॉकरोच जनता पार्टी) यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाने आता मोठे स्वरूप धारण केले आहे. NEET पेपरफुटी प्रकरणातील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ हजारो तरुण आंदोलनात सहभागी झाले असून राजधानीत वातावरण तापले आहे. या आंदोलनामुळे राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे.

संसदेकडे मोर्चा काढण्यासाठी आंदोलकांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना अडवत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ जंतर-मंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी भेट ठरल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या भेटीनंतर विविध स्तरांवर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या असून याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
यासंदर्भात CJP कडून सोशल मीडियावर एक पोस्टही करण्यात आली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील राजकीय हालचालींना वेग आला असून पुढील काही दिवसांत महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.