Devendra Fadnavis : मुर्खपणा, शाकाहारी खाणाऱ्यांना नंपुसक… 15 ऑगस्टला मांसविक्री बंदीच्या निर्णयावर मुख्यमंत्री स्पष्टच म्हणाले…
कबुतरखान्यावरून राज्याच्या राजधानीमध्ये वातावरण चांगलंच तापलं असताना फडणवीसांनी यावरही भाष्य केले आहे.
स्वातंत्र्य दिनी अर्थात १५ ऑगस्ट रोजी काही जिल्ह्यांमध्ये मांस विक्री बंद ठेवण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे, यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनी म्हटलं की, राज्य सरकारनं कुठलाही असा निर्णय घेतलेला नाही. १९८८ रोजी तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतला होता. तसा जीआर त्यावेळी काढण्यात आला होता. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी देखील अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला होता. कोणी काय खावं हे ठरवण्यात काहीही रस नाही, आमच्या पुढे अनेक प्रश्न आहे. त्यामुळे विनाकारण १९८८ साली घेण्यात आलेल्या निर्णयावर आज वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे फडणवीस म्हणाले. काही लोकं शाकाहारी खाणाऱ्यांना नंपुसक म्हणायला लागले आहेत, हा मुर्खपणा बंद केला पाहिजे, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात

