Devendra Fadnavis : अध्यक्षांच्या अंगावर धावून जाणं, असं…; पटोलेंनी माफी मागावी, मुख्यमंत्र्यांची मागणी
Maharashtra Assembly Mansoon Session : नाना पटोले यांच्या सभागृहातील आक्रमक भूमिकेवर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी आज कॉंग्रेस नेते नाना पटोले यांचं दिवसभरासाठी निलंबन करण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्षांनी ही कारवाई केली आहे. नाना पटोले हे विधानसभा अध्यक्षांच्या खुर्ची जवळ गेले. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षांच्या समोर असलेल्या राजदंडाला देखील स्पर्श केला. लोणीकरांच्या वक्तव्यामुळे नाना पटोले आज सभागृहात आक्रमक झाले होते. तर नाना पटोले यांनी माफी मागावी अशी मागणी यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नाना पटोले यांच्या कृती वरुन काँग्रेसवर निशाणा साधला. सभागृहात आजपर्यंत अनेकदा आपण असे गोंधळ पाहिले आहेत. मात्र, अध्यक्षांचीच चुकी असल्यासारखे पटोले अध्यक्षांच्या अंगावर धावून गेले असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. या सभागृहात असे कधीच झाले नसल्याचे म्हणत नाना पटोले यांनी माफी मागावी अशीही मागणी त्यांनी केली.

भास्कर जाधवांना हातवारे करणं भोवलं, विधान भवनाच्या पायऱ्यांवर लोटांगण

Padalkar : तुम्हाला जमत नसेल तर मी बोलत नाही, पडळकर भरसभागृहात भडकले

एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, 'विधान भवनाचं पावित्र्य ...'

भास्कर जाधवांवर का आली सभागृहात वारंवार माफी मागण्याची वेळ?
