CM Devendra Fadnavis : ते राजकारण करताय, त्यांना ते करू द्या; कोरटकर प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
Devendra Fadnavis Statement On Prashant Koratkar : इंद्रजीत सावंत यांना धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरला जामीन देण्यात आला आहे. त्यानंतर महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झालेले आहे. यावर आज कोल्हापूर दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विरोधक केवळ राजकारण करत आहेत. पोलिसांकडून या संदर्भात ताबडतोब गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशांत कोरटकरला प्रकरणात दिली आहे. इंद्रजीत सावंत यांना धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरला जामीन मिळाला आहे. यानंतर कोल्हापूरमधील महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला. यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, इतकेच नाही तर न्यायालयाने त्याला अटक न करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी न्यायालयात अपील दाखल केले आहे. त्यांची सुनावणी देखील लवकरच होणार आहे. या अपिलामध्ये पोलिसांनी आम्हाला आरोपीला तपासाठी ताब्यात घेण्याची आवश्यकता असल्याने सेशन कोर्टाने दिलेला दिलासा काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. पण काही लोकांना केवळ त्यावर राजकारण करायचे आहे. ते राजकारण करत आहे, त्यांना ते करू द्या, असं फडणवीस यांनी म्हंटलं आहे.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार

'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब

पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड

'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
