AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अयोध्येत कारसेवा करणारी महिला नेता विधानपरिषदेत, मनिषा कायंदेंनी घेतली आमदारकीची शपथ

अयोध्येत कारसेवा करणारी महिला नेता विधानपरिषदेत, मनिषा कायंदेंनी घेतली आमदारकीची शपथ

| Updated on: Oct 15, 2024 | 2:00 PM
Share

आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महायुतीकडून राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तयार करण्यात आली होती. यानुसार 12 रिक्त जागांपैकी 7 जणांची निश्चित करण्यात आली. राज्यपाल नियुक्त 7 आमदारांचा शपथविधी आज पार पडला. या आमदारांना उपसभापती डॉ नीलम गोऱ्हेंनी शपथ दिली.

आज महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. दुपारी 12 वाजता विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला. शिवसेनेकडून माजी खासदार हेमंत पाटील आणि मनिषा कायंदे यांना राज्यपाल कोट्यातून आमदारकीची संधी देण्यात आली आहे. नुकताच यांनी आमदारकीची शपथ घेतली आहे. त्यांना उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे या विधानपरिषद सदस्यांना शपथ दिली. राजकीय वर्तुळात आपली स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण शिवसेनेच्या प्रवक्त्या, आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी आमदारकीची शपथ घेतली. बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झालेल्या कायंदे या आज शिवसेनेत कार्यरत आहेत. महिलांवरील अत्याचार, महिलांना आरक्षण, महिलांच्या रेल्वे प्रवासाच्या समस्या आदी मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने आंदोलने केली असून 1992 मध्ये मनिषा कायंदेही वडिलांबरोबर अयोध्येला कारसेवासाठी गेल्या होत्या. अयोध्येला जाऊन आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये काम सुरू केलं. तब्बल 25 ते 30 वर्षे त्यांनी भाजपमध्ये काम केलं सध्या त्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत आहेत.

Published on: Oct 15, 2024 02:00 PM