महिलांचा बुलंद आवाज विधान परिषदेत, आमदारकीची शपथ; चित्रा वाघ यांची सेकंड इनिंग सुरू
महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी नुकताच पार पडला. या सात जणांनी आमदारकीची शपथ घेतली आहे. यात भाजपच्या फायरब्रँड नेत्या चित्रा वाघ यांचाही समावेश आहे. जाणून घ्या, चित्रा वाघ यांचा राजकीय प्रवास कसा?
राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारकीसाठी 12 आमदारांची नियुक्ती रखडली होती. अखेर आज राज्यपाल नियुक्ती आमदारकीसाठी 12 पैकी 7 नेत्यांची आमदारकीची शपथ घेतली. यामध्ये महिलांचा बुलंद आवाज विधान परिषदेत पुन्हा एकदा गाजताना दिसणार आहे कारण भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आमदारकीची शपथ घेतली. गेली 20 वर्षे चित्र वाघ यांनी राष्ट्रवादी पक्षात काम केलं. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा राहिल्या. राज्य महिला आयोगाच्या सदस्यही त्या होत्या. 2019 ला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत. दरम्यान, राज्य सरकारकडून राज्यपाल नियुक्त 12 जागांपैकी 7 जागांसाठी उमेदवारांची नावे राज्यपालांकडे पाठवण्यात आली होती. या राज्यपाल नियुक्त सात आमदारांमध्ये भाजपकडून चित्रा वाघ, विक्रम पाटील, धर्मगुरु महाराज राठोड या तिघांना संधी देण्यात आली आहे. नुकतीच यांनी आमदारकीची शपथ घेतली.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?

