CM Fadnavis : सोलापुरात एका रात्रीत फडणवीसांनी ‘गेम’ फिरवला, महायुतीतच फोडाफोडी 5 माजी आमदार भाजपच्या वाटेवर..
देवेंद्र फडणवीसांच्या सोलापूर दौऱ्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठा गेम फिरवला आहे. पाच माजी आमदार भाजपच्या वाटेवर असून, यातील तीन राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. फडणवीसांनी एका पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमातच अनेक नेत्यांशी संवाद साधत राजकीय समीकरणे बदलली.
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या बुधवारी देवेंद्र फडणवीसांच्या एका भेटीने मोठा भूकंप घडवला आहे. फडणवीसांनी सोलापूरमध्ये सुधाकर परिचारक यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. याच कार्यक्रमाच्या स्टेजवर त्यांनी जिल्ह्यातील राजकारणाची सूत्रे फिरवली. मिळालेल्या माहितीनुसार, पाच माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. यातील तीन माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत.
कार्यक्रमादरम्यान, फडणवीसांनी विविध पक्षांच्या नेत्यांशी, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी संवाद साधला. यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे आमदार राजू खारे, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील आणि करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांचा समावेश होता. तसेच, माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनीही फडणवीसांची भेट घेतली. फडणवीस आणि भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यातही चर्चा झाली. विधान परिषदेचे भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांनीही फडणवीसांशी संवाद साधला.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

