हे काय मॅच जिंकणार! विधानसभेत त्यांच्या…, फडणवीसांच्या ‘त्या’ दाव्यावर कुणाचा टोला?
विधानसभा निवडणुकीसंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मोठं वक्तव्य केले आहे. विधानसेभेची मॅच महायुतीच जिंकणार असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी करत विश्वास व्यक्त केला आहे. आमची मॅच टीम इंडियासारखीच असेल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावर जालना येथील कॉंग्रेस नेत्यानं प्रतिक्रिया दिली आहे.
T20 वर्ल्डकपमधील भारताच्या दमदार आणि ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण देशातील क्रिकेटप्रेमींकडून भारतीय संघाचं कौतुक करण्यात येतंय. मात्र यानंतर राजकीय वर्तुळात वेगळंच राजकारण सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीसंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मोठं वक्तव्य केले आहे. विधानसेभेची मॅच महायुतीच जिंकणार असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी करत विश्वास व्यक्त केला आहे. आमची मॅच टीम इंडियासारखीच असेल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावर जालना येथील कॉंग्रेस नेत्यानं प्रतिक्रिया दिली आहे. ‘मॅच अमेरिकेत झाली म्हणून इंडिया जिंकली ती जर गुजरातच्या अहमदाबादला झाली असती तर इंडीया हरली असती. त्यातही राजकारण केलं असतं.’, कैलास गोरंट्याल यांनी भाजपाला असा खोचक टोला लगावला आहे. पुढे ते असेही म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचे 105 आमदार असूनही ते उपमुख्यमंत्री झाले, ते काय विधानसभेची मॅच जिंकणार? त्यांच्या विधानसभेत केवळ 20 जागाच येणार असा टोला कैलास गोरंट्याल यांनी लगावला आहे.
!['संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल 'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/eknath-shinde-1-1.jpg?w=280&ar=16:9)
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
!['..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम '..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/11/Narayan-Rane-1.jpg?w=280&ar=16:9)
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
!['भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले? 'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/HAKE-AND-JARANGE-.jpg?w=280&ar=16:9)
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
!['तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया 'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/santosh-deshmukh-wife-.jpg?w=280&ar=16:9)
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
![जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले... जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/laxman-hake-1.jpg?w=280&ar=16:9)