'इकडे परत येऊ शकत नाही आणि तिकडे दुखवू शकत नाही', विजय वडेट्टीवार यांचा रोख कुणावर?

‘इकडे परत येऊ शकत नाही आणि तिकडे दुखवू शकत नाही’, विजय वडेट्टीवार यांचा रोख कुणावर?

| Updated on: Jun 10, 2024 | 1:25 PM

'प्रभू रामचंद्राने अयोध्येमध्ये सुद्धा इंडिया आघाडीला आशीर्वाद दिला आहे. आता राष्ट्रवादी या दुखातून कसे सावरतात हे पहावे लागणार आहे. राष्ट्रवादीचा एक खासदार आहे आणि भाजपने मॅजिक आकडा पूर्ण केला आहे त्यामुळे हे राहिले काय आणि गेले काय त्यांना काही फरक पडणार नाही', विजय वडेट्टीवार यांचा रोख कुणावर?

भाजपचे नेहमीच धोरण आहे, उपयोगी आहे तोपर्यंत उपभोगात आणायचं आणि निरुपयोगी झालं की काढून फेकायचं, असं वक्तव्य करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि राज्याचे विरोधी पक्षनेते भाजपवर जिव्हारी लागणारी टीका केली आहे. विजय वडेट्टीवार पुढे असेही म्हणाले की, आता राष्ट्रवादी अजित पवार गटाची हीच स्थिती आहे, त्यांची उपयुक्तता संपली आहे. त्यामुळे भाजपने ठरविलं आहे, उपयुक्तता संपली की डस्टबिनमध्ये माणसांना टाकायचं, असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी भाजपला खोचक टोला लगावला आहे. प्रभू रामचंद्राने अयोध्येमध्ये सुद्धा इंडिया आघाडीला आशीर्वाद दिला आहे. आता राष्ट्रवादी या दुखातून कसे सावरतात हे पहावे लागणार आहे. राष्ट्रवादीचा एक खासदार आहे आणि भाजपने मॅजिक आकडा पूर्ण केला आहे त्यामुळे हे राहिले काय आणि गेले काय त्यांना काही फरक पडणार नाही मात्र यांची मजबुरी आहे यांना राहावंच लागणार आहे कारण हे इकडे परत येऊ शकत नाही आणि तिकडे दुखवू शकत नाही, असे म्हणत प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधला आहे.

Published on: Jun 10, 2024 01:25 PM