Covid 19 : मुंबईत पुन्हा कोरोनाची एन्ट्री? केईएममध्ये कोरोनाबाधित 2 रुग्णांचा मृत्यू, नेमकं काय प्रकरण?
मुंबईच्या केईएम रुग्णालयामध्ये संशयित कोरोना बाधित असलेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
मुंबईतील केईएम रूग्णालयात कोरोनाबाधित असलेल्या दोन रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृत्य झालेल्या दोन्ही रूग्णांना कोरोनासह इतर व्याधी होत्या, असं केईएम रूग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे. कोरोना बाधित असलेल्या ५८ वर्षीय कोरोना बाधित महिलेचा मृत्यू झालाय, असं केईएम रूग्णालयाचं म्हणणं आहे तर १३ वर्षीय कोरोनाबाधित मुलीचा मूत्रपिंडाच्या आजाराने मृत्यू झाल्याची माहिती देखील केईएम रूग्णालयाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलेल्या टीकेनंतर केईएम रूग्णालयाकडून हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. किशोरी पेडणेकर यांनी या दोन रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळं झाल्याचं म्हटलं होतं. त्यामुळं केईएम रुग्णालयातील या दोन रुग्णांचे रुग्णांचे मृत्यू नेमके कशामुळं झाले याबाबत संभ्रम निर्माण झाला असताना आता हे स्पष्टीकरण समोर आलं आहे.