AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Cases In India : देशात कोरोनाची रुग्ण संख्या 257वर, तर राज्यात 53 कोरोना बाधित

Corona Cases In India : देशात कोरोनाची रुग्ण संख्या 257वर, तर राज्यात 53 कोरोना बाधित

| Updated on: May 20, 2025 | 5:12 PM

Health Minister Prakash Abitkar : राज्यात वाढती कोरोना रुग्णांची संख्या बघता राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत नागरिकांना महत्वाचे आवाहन केले आहे.

सिंगापूर, हाँगकाँगमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे. भारतातील आरोग्य यंत्रणा त्यामुळे अलर्ट मोडवर आहे. देशात सध्या 257 कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे. तर देशात कोरोना स्थिती नियंत्रणात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिलेली आहे. तसंच घाबरण्याचं कोणतही कारण नसल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री आबिटकर यांनी म्हंटल आहे. मुंबई महानगपालिकेच्या हद्दीत आतापर्यंत 53 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे.

याबद्दल बोलताना आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, राज्यात कोरोना वाढला तरी घाबरण्याचे काम नाही. सगळ्यांची  रोगप्रतिकार शक्ती वाढलेली आहे, त्यामुळे घाबरुन जाऊ नका. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका. सध्या आरोग्य विभागाकडून मॅपिंग सुरु आहे. राज्य शासन सर्व आजारावर काम करण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी सक्षम आहे. सरकार पूर्णपणे अलर्टवर आहे. लोकांनी कुठेही घाबरु नये, असं आवाहन प्रकाश आबिटकर यांनी म्हंटलं आहे.

Published on: May 20, 2025 05:00 PM