अद्भुत…अद्भुत…. कॉमेंट्री ऐकावी की क्रिकेट पहावा? भन्नाट.. ऐकणारेही शब्दामागे धावत सुटतात

मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगू, मल्याळम आदी भाषांमध्ये कॉमेंट्री केली जाते. इंटरनेटवर संस्कृत भाषेतली ही कॉमेडी तुफान व्हायरल होतेय. मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगू, मल्याळम आदी भाषांमध्ये कॉमेंट्री केली जाते.

अद्भुत...अद्भुत.... कॉमेंट्री ऐकावी की क्रिकेट पहावा? भन्नाट.. ऐकणारेही शब्दामागे धावत सुटतात
Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Oct 04, 2022 | 10:29 AM

प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं स्टेडियम. रंगात आलेली मॅच आणि उत्साहात सुरु असलेली कॉमेंट्री. पण मॅचमध्ये (Cricket Match) काय होतंय यापेक्षा कॉमेंट्री करणाऱ्याकडेच जास्त लक्ष वेधलं जातं…असं कधी झालंय का? एका व्हिडिओत तसंच दिसतंय… कॉमेंट्रीकाराच्या (Coventry) तोंडातून ज्या वेगानं शब्द बाहेर पडतायत… ऐकणाऱ्याचे कान त्याच दिशेने धाव घेतायत.. खरं तर व्हिडिओत (Viral Video) दिसणारं गल्ली क्रिकेट आहे. पण त्याची एवढी अफलातून.. अस्खलित संस्कृत भाषेतील कॉमेंट्री ऐकून सध्या नेटकरी घायाळ झालेत.

एका गल्ली क्रिकेटमधील ही कॉमेंट्री सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालतेय. कॉमेंट्री करणारा संस्कृत भाषेत एवढ्या झर्र झर्र बोलतोय की, ऐकणारे हे शब्द ऐकून घायाळ होतायत. नेटकऱ्यांनी तर यावर अद्भुत… अद्भुत… एवढीच प्रतिक्रिया दिलीय.

व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच कॉमेंट्रीकाराने मी बंगळुरू शहरात असल्याचं म्हटलंय. बहुधा संस्कृत बोलणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीच ही मॅच पाहत आहेत…

गॅलरीत उभ्या असलेल्या दोन महिलांशीही व्हिडिओ बनवणाऱ्याने संस्कृतमध्ये संवाद साधला. पण महिलांनी बोलण्यास संकोच दर्शवल्यानंतर त्याने क्रिकेटवर लक्ष केंद्रीत केलं…

त्यानंतर अद्भुत असा क्रिकेटचा सामना सुरु असल्याचं कॉमेंट्रीकार म्हणतोय.. बॉलरच्या बॉलवर बॅट्समनने फटकार लगावली… त्यानंतरची कॉमेंट्री ऐकण्यासारखीच आहे….

इंटरनेटवर संस्कृत भाषेतली ही कॉमेडी तुफान व्हायरल होतेय. मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगू, मल्याळम आदी भाषांमध्ये कॉमेंट्री केली जाते.

पण आगामी काळात संस्कृत भाषेतील कॉमेंट्रीही ऐकायला आली तर नवल वाटणार नाही.

लक्ष्मी नारायण बी एस या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ टाकण्यात आलाय.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.