लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदेंनी आणलीय, आता एक भाऊ क्रेडिट घेऊ पाहतोय; दादा भुसेंनी फडणवीस यांना डिवचलं
मालेगावात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची सभा होती. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी पक्षांनाच फटकारलं आहे. लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे यांनीच आणली आहे. आता कुणी तरी भाऊ क्रेडिट घेऊ पाहत आहे.
महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. आज सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. कुणी डोअर टू डोअर व्हिजिट करतंय, कुणी गल्लोगल्लीत जाऊन प्रचार करतंय, तर कुणी कॉर्नर बैठका घेऊन मतदारांशी संवाद साधत आहेत. काही लोकांनी तर रॅली काढण्यावर भर दिला आहे. उमेदवारांपासून ते पक्षांच्या बड्या नेत्यांपर्यंत सर्वांनीच आज प्रचारात झोकून दिलं आहे. कालही सर्वच उमेदवारांनी जाहीर सभा घेऊन एकमेकांवर आरोप करतानाच आपल्यावरील आरोपांचंही खंडन केलं आहे. तसेच अनेक कामांचं श्रेय घेण्याचाही प्रयत्न केला आहे. काल मालेगावात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची सभा होती. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी पक्षांनाच फटकारलं आहे. लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे यांनीच आणली आहे. आता कुणी तरी भाऊ क्रेडिट घेऊ पाहत आहे, असा टोलाच दादा भुसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

