Eknath Shinde Video : आपत्ती व्यवस्थापनात फडणवीस अन् अजितदादा पण शिंदेंना वगळलं? म्हणाले; ‘…मला माहिती नाही’
मुंबईत जुलै 2005 साली आलेल्या अतिवृष्टी, पुरानंतर राज्यात आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली होती. आपातकालीन परिस्थितीकरता स्थापन करण्यात आलेली समिती मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याचे काम करते.
राज्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र या समितीतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वगळण्यात आलंय. यानंतर महायुतीमध्ये वितुष्ट निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगली रंगत आहे. मुंबईत जुलै 2005 साली आलेल्या अतिवृष्टी, पुरानंतर राज्यात आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली होती. आपातकालीन परिस्थितीकरता स्थापन करण्यात आलेली समिती मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याचे काम करते. तर मुख्यमंत्री या समितीचा अध्यक्ष असतो. यानुसार या समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे आली. नव्या समितीमध्ये अर्थमंत्री अजित पवारांसह महसूल, मदत व पुनवर्सन, आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य समितीचे मंत्र्यांचा समावेश करण्यात आलाय परंतु, एकनाथ शिंदे यांना या समितीमध्ये स्थान मिळाले नव्हते. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असताना एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘आपत्ती व्यवस्थापन समिती कधी झाली मला माहिती नाही. पण मला एवढं माहिती आहे. जिथे आपत्ती येते तिथे एकनाथ शिंदे असतो.’, असे त्यांनी म्हटलेय.

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल

ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान

सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती

'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
