Eknath Shinde Video: अजित दादांच्या बैठकीला शिवसेनेचा एकही आमदार नाही, एकनाथ शिंदे स्पष्टच म्हणाले…
उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजितदादांच्या उपस्थितीत रायगड येथे डीपीडीसीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या बैठकीला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील एकही आमदार ऑनलाईन हजर नाही
उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज रायगड जिल्हा नियोजन समितीची एक ऑनलाईन बैठक पार पडली. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांशिवाय रायगड जिल्हा नियोजनाची बैठक झाल्याचे समोर आले आहे. कारण या बैठकीला रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचा एकही आमदा उपस्थित नव्हता. तर या बैठकीची रायगड जिल्ह्यातील कोणत्याही आमदारांना माहिती नव्हती, असं आमदारांनी म्हटलंय. तर अजित पवारांच्या बैठकीला आदिती तटकरे आणि जिल्हाधिकाऱ्यांची ऑनलाईन उपस्थिती होती. तर दुसरीकडे ही ऑनलाईन बैठक असताना भरत गोगावले मात्र रायगडावर असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, भरत गोगावले यांना या बैठकीचं निमंत्रण होतं मात्र ते हजर नव्हते, असं दादांच्या कार्यालयाने सांगितले आहे. यानंतर शिंदे गटाने या बैठकीला अनुपस्थित राहत थेट पालकमंत्रिपदावरून नाराजीचा सूर असल्याचा संदेश दिलाय का? अशी चर्चा सुरू झालीये. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर थेट उत्तर दिलंय. ‘ आज पालकमंत्र्यांची बैठक नव्हती. रायगड जिल्हा नियोजनची बैठक होती आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वादही लवकरच सुटेल’, असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल

ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान

सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती

'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
