Ajit Pawar : बीडच्या परळी दौऱ्यावर असताना अजितदादा भडकले, वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्या चढत होते अन्… नेमकं काय घडलं?
वैद्यनाथाच्या दर्शनाला पायऱ्या चढून जाताना अजित पवारांना तिथलं काम व्यवस्थित नसल्याचे लक्षात येताच कंत्राटदाराला चांगलंच खडसावलं. माझ्यासोबत असं बिल्कुल चालणार नाही अशी तंबी दादांनी कंत्राटदाराला दिली.
राज्याचे उपमुख्यमंत्री, बीडचे पालकमंत्री अजित पवार आज सोमवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. बीडच्या परळीतून दाखल पोहोचून अजित पवारांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. परळीत दाखल होताच त्यांनी विविध विकास कामांचा आढावा घेतला. या दौऱ्यादरम्यान अजित पवार यांच्या सोबत भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे हे देखील हजर होते. अजित पवार यांनी सर्वप्रथम वैद्यनाथाचे दर्शन घेऊन आपला दौरा सुरू केला. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग परळी वैद्यनाथ क्षेत्राच्या विकास आराखड्यासाठी बैठक घेणार होते यासाठी ते मंदिराजवळ पोहोचले मात्र तिथे जात असताना मंदिराच्या पायऱ्या चढत असताना तिथलं काम व्यवस्थित नसल्याचं अजित पवार यांच्या लक्षात आलं आणि लगेचच त्यांनी कंत्राटदाराला चांगलंच फैलावर घेतलं. अजित पवार आपल्या स्पष्ट वक्तव्य आणि रोखठोक भूमिकेमुळे नेहमीच ओळखले जातात. त्याचीच अनुभूती दादा आज परळीत असताना आली.