Solapur : राजकीय भूकंप! दादांचे 3 माजी आमदार भाजपच्या वाटेवर, अजित पवारांची राष्ट्रवादी सतर्क अन्…
सोलापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन माजी आमदार आणि एका काँग्रेसच्या माजी आमदाराचा भाजप प्रवेश अपेक्षित आहे. या संभाव्य पक्षबदलामुळे राष्ट्रवादी सतर्क झाली असून, गळती रोखण्यासाठी नेते दत्तात्रय भरणे सोलापूर दौऱ्यावर आहेत. या घडामोडींमुळे सोलापूरच्या राजकारणात मोठे बदल अपेक्षित आहेत.
सोलापूरच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन माजी आमदार आणि एक काँग्रेसचा माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. माढ्यातील माजी आमदार बबनदादा शिंदे, त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे आणि विक्रमसिंह शिंदे, मोहोळमधील माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने हे भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. तर काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्याही भाजप प्रवेशाची शक्यता आहे.
या संभाव्य पक्षबदलामुळे अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सतर्क झाली असून, पक्षातील गळती रोखण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे सोलापूरच्या दौऱ्यावर असून, त्यांनी शहर आणि ग्रामीण विभागाची स्वतंत्र बैठक आयोजित केली आहे. भरणेंनी जरी कोणताही नेता पक्ष सोडणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला असला तरी, भाजपमध्ये होणाऱ्या या इनकमिंगमुळे सोलापूरच्या राजकारणात मोठे बदल घडू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

