देवेंद्र फडणवीस यांच्या ‘त्या’ गंभीर आरोपावर शरद पवार गटाचा पलटवार
देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर शरद पवार गटाकडूनही त्यांना प्रत्युत्तर देण्यात आलंय. कुठलाही खेळ अंगाशी आल्यास विरोधक पवाराचं नाव घेतात, असा पलटवार शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.
मुंबई, ३ मार्च २०२४ : शरद पवार यांच्याकडे टीका करायला काही विषय नसल्यास ते जातीवरून आरोप करतात, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर केला. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर शरद पवार गटाकडूनही त्यांना प्रत्युत्तर देण्यात आलंय. कुठलाही खेळ अंगाशी आल्यास विरोधक पवाराचं नाव घेतात, असा पलटवार शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. आगामी निवडणुकीवर भाष्य करत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलंय. तर महायुतीतील पक्ष आपापल्या चिन्हावर लढणार असंही फडणवीस यांनी म्हटलंय. तर शिंदे गटाचे ५० टक्के खासदार कमळ चिन्हावर लढणार असल्याच दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. दिल्लीतून युतीसाठी उद्धव ठाकरे यांच्यावर जाळं टाकल्याचा दावा राऊतांनी केला होता. तर राऊत अजूनही बेशुद्ध आहे असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आलं होतं. मात्र या टीकेवर संजय राऊत यांनी पलटवार केलाय… बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
Published on: Mar 03, 2024 11:57 AM
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा..
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
