सत्तांतरानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात पहिल्यांदाच संवाद
Devendra Fadnavis and Uddhav Thackeray : राज्यातील सत्तांतरानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना पहिल्यांदाच एकत्र पाहिलं गेलं. यावेळी दोघांमध्ये संवाद झाला. नेमकी काय चर्चा झाली? पाहा...
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात सत्तांतर झालं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावरून पाय इतार झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. या सगळ्या राजकीय घडामोडींदरम्यान भाजप आणि ठाकरेगटात मोठी दरी निर्माण झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे दोन नेते एकत्र पाहायला मिळाले नव्हते. पण आज पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना एकत्र पाहिलं गेलं. सध्या विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकाचवेळी विधिमंडळ परिसरात दाखल झाले. दोघेही सभागृहात जात होते. यावेळी दोघांमध्ये संवाद झाला. सत्तांतरानंतर पहिल्यांदाच हे दोन नेते एकत्र पाहायला मिळाले.
Published on: Mar 23, 2023 11:25 AM
Latest Videos
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक

