Devendra Fadnavis | पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान, पेट्रोल-डिझेलचे दर किती?
माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या साठ्याबद्दल माहिती दिली, फडणवीस म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मी आभार मानतो. पेट्रोल डिझेलवर एक्साईज ड्युटी १० रुपये प्रति लिटरनं कमी केली आहे. त्यामुळे कच्चा तेलाच्या वाढलेल्या भावाचा इम्पॅक्ट हा ऑइल कंपनी सहन करणार आहे.
माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या साठ्याबद्दल माहिती दिली, फडणवीस म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मी आभार मानतो. पेट्रोल डिझेलवर एक्साईज ड्युटी १० रुपये प्रति लिटरनं कमी केली आहे. त्यामुळे कच्चा तेलाच्या वाढलेल्या भावाचा इम्पॅक्ट हा ऑइल कंपनी सहन करणार आहे. भारत सरकार सहन करणार आहे, त्यामुळे सामान्य ग्राहकांना अधिकच्या दरात पेट्रोल डिझेल घ्यावे लागणार नाही. याबद्दल फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी आणि भारत सरकारचे आभार मानले आहे. विशेषतः ज्या वेळी आपल्या आजूबाजूच्या देशात जवळपास शटडाऊनची स्थिती आहे. पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश यांनी ऑफिसेस बंद केले आहेत. अशावेळी भारताने उत्तम मॅनेजमेंट केलंय. घरगुती गॅस आणि इतर कुठेही कमतरता होऊ दिली नाही. सर्वांना विनंती करतो विनाकारण अफवेच्या आधारावर रांगा लावू नये. विनाकारण रांगा लावल्या तर सप्लायवर ताण येतो आणि कृत्रिम टंचाई निर्माण होते. जसं पेट्रोल डिझेल भरतो तसंच आपण भरावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले .