दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना

दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना

| Updated on: Sep 12, 2026 | 9:13 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज ब्रिक्स परिषदेसाठी दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत भेट होण्याची शक्यता आहे. ब्रिक्स परिषदेनिमित्त पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची द्विपक्षीय बैठक झाली, तर यापूर्वी मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात संरक्षण आणि व्यापार वाढीवर चर्चा झाली.

मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज ब्रिक्स परिषदेसाठी दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले आहेत. नागपूरहून ते थोड्याच वेळात दिल्लीसाठी निघणार आहेत. दिल्लीमध्ये फडणवीस भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. याच ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आज दुपारी साडेबारा वाजता भारतात दाखल झाले आहेत.

तब्बल सात वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा आहे. ब्रिक्स परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांची संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास द्विपक्षीय बैठक होणार आहे. या बैठकीत भारत-चीन संबंधांवर चर्चा अपेक्षित आहे. अठरावी ब्रिक्स परिषद भारतात पार पडत आहे. या परिषदेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात भारत मंडपम येथे द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीत मोदींनी पुतिन यांचे गळाभेट घेऊन स्वागत केले. सुमारे 45 मिनिटे चाललेल्या या चर्चेत संरक्षण, ऊर्जा आणि इतर विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर सहमती झाली. भारत आणि रशियातील सध्याची 65 अब्ज अमेरिकी डॉलरची व्यापार उलाढाल 2030 पर्यंत 100 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत वाढवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

Published on: Sep 12, 2026 9:13 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us