पुन्हा पंजाबमध्ये मोठी घडामोड! मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसशी संबंधित लोक EDच्या रडारवर, नेमकं प्रकरण काय?

पुन्हा पंजाबमध्ये मोठी घडामोड! मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसशी संबंधित लोक EDच्या रडारवर, नेमकं प्रकरण काय?

| Updated on: May 07, 2026 | 12:30 PM

पंजाबमध्ये पुन्हा एकदा मोठी राजकीय आणि प्रशासकीय घडामोड समोर आली आहे. पंजाबमधील मोहाली आणि चंदीगड येथे तब्बल 12 ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. मनी लॉंड्रिंग आणि जमीन व्यवहारांशी संबंधित संशयास्पद आर्थिक व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

पंजाबमध्ये पुन्हा एकदा मोठी राजकीय आणि प्रशासकीय घडामोड समोर आली आहे. पंजाबमधील मोहाली आणि चंदीगड येथे तब्बल 12 ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. मनी लॉंड्रिंग आणि जमीन व्यवहारांशी संबंधित संशयास्पद आर्थिक व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. गुप्त सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनंतर ईडीने विशेष पथक तयार करून ही मोठी मोहीम राबवली.

ईडीकडून सध्या जमीन व्यवहार आणि आर्थिक देवाणघेवाणींचा सखोल तपास सुरू असून, या प्रकरणात पंजाबच्या मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंधित लोक ईडीच्या रडारवर आहेत. यामध्ये काही व्यक्तींची देखील चौकशी केली जाऊ शकते. या तपासातून अनेक संवेदनशील कागदपत्रे आणि महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पंजाबच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Published on: May 07, 2026 12:30 PM
Follow Us