Vikram Misri : भारतावर आणखी दहशतवादी हल्ल्याचा डाव होता? परराष्ट्र सचिवांचा खळबळजनक दावा काय?
पहलगाममध्ये निष्पाप लोकांना मारणाऱ्या दहशतावाद्यांचा बदला घेण्यासाठी भारताने काल मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली. यानंतर सेनेकडून महत्वाची प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली.
भारताकडून पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पहलगाम हल्ला हा मुंबईत झालेल्या २६/११ हल्ल्यानंतरचा सर्वात क्रूर हल्ला असल्याचे म्हटले. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी यावेळी एक खळबळजनक दावा केला. ते म्हणाले, गुप्तचर यंत्रणांनी भारतावर पाकिस्तानकडून आणखी हल्ले होऊ शकतात असे संकेत दिले आहेत. तर जम्मू आणि काश्मीरमधील सामान्य परिस्थिती बिघडवण्यासाठी तो भ्याड हल्ला करण्यात आला होता. गेल्या वर्षी २.२५ कोटींहून अधिक पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली होती. या हल्ल्याचा उद्देश जम्मू आणि काश्मीरला मागास ठेवणे हा होता. हा हल्ला जातीय दंगली भडकवण्यासाठीही करण्यात आला असल्याचेही त्यांनी म्हटले. दरम्यान, पहलगाम येथील या हल्ल्यानंतर भारतात मोठा आक्रोश होता. त्यामुळे भारताने पाकिस्तानसोबतचे संबंध तोडले, काही मोठे निर्णय घेतले. त्यानंतर २२ एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्याच्या मास्टरमाइंडला धडा शिकवण्याचं ठरवलं असं म्हणत विक्रम मिस्री यांनी या पत्रकार परिषदेतून ऑपरेशन सिंदूरबद्दल संपूर्ण माहिती दिली.
विधान परिषद जागावाटपावरून महायुतीत धुसफूस; दिल्ली-पासून मुंबईपर्यंत...
NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट! CBI च्या झडतीत धक्कादायक खुलासा
तू मागच्या जन्मी नागिण होतीस! म्हणत अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढलं? अन्
12 दिवसांत चौथ्यांदा CNG महागलं! इंधन दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडंच
