Vikram Misri : दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने आपला अधिकार… ऑपरेशन सिंदूरनंतर परराष्ट्र सचिवांची माहिती
पहलगाम घटनेनंतर भारतात संताप दिसून आला. भारत सरकारने पाकिस्तानसोबतच्या संबंधांबाबत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. ऑपरेशन सिंदूक अंतर्गत केलेली कारवाई जबाबदारीने करण्यात आली आहे, असे परराष्ट्र सचिवांनी म्हटले.
जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. या घटनेनंतर संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली होती. यावेळी भारताने करार जबाब मिलेगा.. असं म्हणत पाकिस्तानविरोधात अनेक कठोर निर्णय घेतले. दरम्यान, भारतीय सैन्याकडून काल मध्यरात्री पाकिस्तानवर हवाई हल्ला करत पाकिस्तानातील 9 ठिकाणी हल्ला केला. पाकिस्तानवर कऱण्यात आलेल्या या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले आहे. ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर सेनेकडून एक पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर भाष्य केले. २२ एप्रिलच्या हल्ल्यातील गुन्हेगारांना आणि योजना आखणाऱ्यांना रोखणे आवश्यक होते. पाकिस्तानने पहलगाम हल्ला केल्यानंतर त्यावर कोणतीही स्पष्ट कारवाई केली नाही. पाकिस्तानने उलट आरोप केले. आमच्या गुप्तचर यंत्रणेने भारताविरुद्ध आणखी हल्ले होऊ शकतात असे सूचित केले होते. आणि हे थांबवणे आवश्यक होते, असे परराष्ट्र सचिवांनी सांगितले. तर भारताने सीमापार हल्ले रोखण्याचा आणि त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आपला अधिकार वापरला आहे, असेही म्हटले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

