AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yoshomati Thakur| मला चित्राताईंची फार आठवण आली, भाजपमध्ये महिलांचा सन्मान होत नाही, सोलापूरच्या घटनेनंतर यशोमती ठाकूर यांनी हाणला टोला

Yoshomati Thakur| मला चित्राताईंची फार आठवण आली, भाजपमध्ये महिलांचा सन्मान होत नाही, सोलापूरच्या घटनेनंतर यशोमती ठाकूर यांनी हाणला टोला

| Updated on: Jul 13, 2022 | 6:46 PM
Share

Yoshomati Thakur On Chitra Wagh : सोलापूरचे माजी भाजपा जिल्हाध्यक्षांच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओवरुन माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी चित्रा वाघ यांना टोला हाणला

Yoshomati Thakur News : सोलापूरसह राज्यातील राजकारणाला हादरा देणा-या व्हायरल व्हिडिओवर(Viral Video) माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी ही तोंडसूख घेतले. समाज माध्यमांवर (Social Media) दोन दिवसांपासून प्रचंड व्हायरल व्हिडिओच्या आडून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना टोला हाणला. ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. भाजपामध्ये नेहमीच महिलांना अपमानास्पद वागणूक मिळते असा आरोप त्यांनी केला. अशा प्रकारावर नेहमी टीकेची झोड उडवणा-या चित्रा वाघ यांची या प्रकाराबाबतच्या भूमिकेवर ठाकूर यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. त्या बुधवारी पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी राज्यातील विविध मुद्यांवर संवाद साधला. यावेळी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख (Shrikant Deshmukh) यांच्या व्हायरल व्हिडिओवरुन भाजप नेत्या चित्रा वाघ यांना लक्ष्य केले. ही घटना मान खाली घालायला लावणारी असून लज्जास्पद असल्याचे त्या म्हणाल्या.