संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा; लाखो भाविकांची शेगावात मांदियाळी

संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा; लाखो भाविकांची शेगावात मांदियाळी

राखी राजपूत | Updated on: Feb 08, 2026 | 1:25 PM

शेगावात संत गजानन महाराजांचा 148 वा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या निमित्ताने राज्यभरातून ७०० हून अधिक दिंड्या आणि तीन ते चार लाख भाविक दाखल झाले आहेत. महाराजांचे मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले असून, भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. आज सकाळी ७ वाजता प्रहारची आरती होऊन उत्सवाला सुरुवात झाली.

शेगावात संत गजानन महाराजांचा 148 वा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगावात या निमित्ताने लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. राज्यभरातून जवळपास ७०० पेक्षा जास्त दिंड्या आणि तीन ते चार लाख भाविक शेगावात दाखल झाले आहेत.

भाविकांच्या सोयीसाठी महाराजांचे मंदिर कालपासून दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून मंदिर परिसर २४ तास भाविकांसाठी खुला आहे. आज सकाळी ७ वाजता प्रहारची आरती होऊन या उत्सवाला विधिवत सुरुवात झाली. गजानन महाराजांच्या समाधी दर्शनासाठी भाविकांना साधारणतः सहा तासांचा अवधी लागत आहे, तर मुखदर्शनासाठी एक ते दीड तास प्रतीक्षा करावी लागत आहे. भाविकांची ही प्रचंड गर्दी महाराजांवरील श्रद्धेचे प्रतीक आहे. कॅमेरामन निलेश देशमुख आणि गणेश सोळंके यांनी टीव्ही ९ मराठीसाठी शेगावातून या सोहळ्याचा आढावा घेतला आहे.

Published on: Feb 08, 2026 1:24 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us