Marathi News Videos Ganesh Chaturthi 2023 Due to Ganpati special train schedule of Konkan Railway has collapsed Many trains are late by 4 hours

Konkan Railway | सलग दुसऱ्या दिवशी कोकण रेल्वे कोलमडली, काय कारण अन् किती तास उशिराने धावतेय ट्रेन?
VIDEO | गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आल्याने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची दिवा रेल्वे स्थानक आणि लोकमान्य टिळक टर्मिनसवर मोठी गर्दी पण कोकण रेल्वेचं वेळापत्रक दुसऱ्या दिवशीही कोलमडलं
ठाणे, १७ सप्टेंबर २०२३ | दरवर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढताना दिसत आहे. गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या दोन दिवसांवर आल्याने गेल्या दोन दिवसांपासून चाकरमान्यांनी कोकणाची वाट धरली आहे. त्यामुळे दिवा रेल्वे स्थानक आणि लोकमान्य टिळक टर्मिनसवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी स्पेशल ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. मात्र गणपती स्पेशल ट्रेनमुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक सलग दुसऱ्या दिवशी कोलमडलं आहे. यामुळे अनेक गाड्या अर्धा ते 4 तासांपर्यंत उशिराने धावत आहेत. तर कोकणात जाण्यासाठी दिवा रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. दिवा-रत्नागिरी पॅसेंजरला प्रचंड गर्दी झाली असल्याचे पाहायला मिळत आहे, यामुळेच कोकण रेल्वेचे वेळापत्रक पुन्हा कोलमडलं आहे.
Published on: Sep 17, 2023 10:18 AM
सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक
CJP Vijeta Dahiya : कॉकरोच जनता पार्टीचा धक्कादायक निर्णय, विजेता दहिया यांना प्रवक्तेपदावरून हटवलं, कारण काय?
राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ
बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!
देशभरातून स्विगी, झोमॅटोने विद्यार्थ्यांना जंतर मंतरवर जेवण पाठवतायेत लोकं
Related Video
बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं घेत...
तीन तासांनंतर प्रियंका गांधी, राहुल गांधींची सुटका
बिग बॉसचा नवा सिझन Bigg Boss 20 चा ट्रेलर लाँच, सलमान खान होस्ट करणार?
कॉकरोच जनता पार्टीचा धक्कादायक निर्णय, विजेता दहिया यांना....
अल्पवयीन मुलाची कोयत्याने वार करुन हत्या, व्हॅनला बांधून भरपावसात धिंड
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!
पवना धरणाच्या परिसरात दमदार पावसाची हजेरी
दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार, अमरावतीत विद्यार्थी आणि पालकांनी काढला निषेध मोर्चा...