अप्सरा आली… गौतमी पाटील चंद्रपुरात प्रचाराला, वडेट्टीवार आणि मुनगंटीवार यांच्यात जुंपली; काय आहे आरोप प्रत्यारोप?
चंद्रपूरमध्ये काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रचारसभेसाठी नृत्यांगना गौतमी पाटील हिला बोलवण्यात आलं होतं. त्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चांगलीच टीका केली होती. काँग्रेस नेत्यांना चंद्रपूरमध्ये यायला धडकी भरली आहे, काँग्रेसला वाचवायला आता गौतमी पाटील आल्यात
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सर्व पक्षांकडून निवडणूक प्रचार जोरदार सुरु आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रचारसभेसाठी नृत्यांगना गौतमी पाटील हिला बोलवण्यात आलं होतं. त्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चांगलीच टीका केली होती. काँग्रेस नेत्यांना चंद्रपूरमध्ये यायला धडकी भरली आहे, काँग्रेसला वाचवायला आता गौतमी पाटील आल्यात, असं मुनगंटीवार म्हणाले होते. काँग्रेससाठी गौतमी पाटील मतं मागतील आणि निवडून आल्यावर त्या पुन्हा येतील, चिंता करू नका. एवढी काँग्रेसची वाईट अवस्था आहे का? असा प्रश्न विचारत मुनगंटीवारांनी विजय वडेट्टीवारांना केला होता.
मुनगंटीवार यांच्या टीकेला विजय वडेट्टीवार यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. गौतमी पाटील या कलाकार आहेत. त्यांना प्रचारासाठी आणलं तर यात वावगं काय? गौतमी काँग्रेसच्या विचारांनी प्रचाराला येते, त्यामुळे अशा गोष्टींमध्ये काही तथ्य नाही. सुधीर मुनगंटीवार यांना एकच सांगणं आहे, आता तुमची चंद्रपूरमध्ये भाजप वाचते की नाही हे तुम्ही बघाच, अशा शब्दात वडेट्टीवारांनी चांगलाच पलटवार केला आहे.
नाशिककरांनी सत्ता दिली होती पण... CM फडणवीसांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
'महायुतीचा प्रचार भरकटलेला...' आदित्य ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल
जो राम का नाही वो काम का नाही! फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला
... मगच नवऱ्याला जेवण वाढा! पंकजा मुंडेंच्या विधानाची रंगली चर्चा

