मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं; ही तर सुरुवात, ठाकरे गटाला एकामागून एक मोठे धक्के बसणार
राज्यातील राजकारणात शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे ठाकरे गटासाठी आणखी एक मोठा धक्का म्हणून पाहिले जात आहे.

या घडामोडीवर भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, सचिन अहिर यांचा निर्णय हा पूर्णपणे शिवसेना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अंतर्गत निर्णय आहे. या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे त्यांनी म्हटले.
गिरीश महाजन म्हणाले, “हा उबाठा गटासाठी मोठा धक्का आहे. आगामी काळात त्यांना आणखी मोठे धक्के बसतील. ते आमच्या नेत्यांवर टीका करत राहू शकतात, काहीही बोलू शकतात, पण स्वतःचा पक्ष सांभाळण्यात ते अपयशी ठरत आहेत.”
पुढे बोलताना त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधत, “दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एकत्र ठेवणे महत्त्वाचे असते. मात्र त्यांना ते जमत नाही. येत्या काळात राज्याच्या राजकारणात आणखी कोणत्या घडामोडी घडतात, ते सर्वांना दिसेल,” असे वक्तव्य केले.
दरम्यान, सचिन अहिर यांच्या उमेदवारीनंतर राज्यातील राजकीय समीकरणांवर पुन्हा चर्चा सुरू झाली असून, या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाकडून काय भूमिका मांडली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Jun 30, 2026 02:03 PM
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का