LPG Cylinder Crisis | गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार सर्वात आधी गॅस?
सरकारने गॅस वितरणाबाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे. याअंतर्गत कोणत्या भागात आणि कोणत्या पद्धतीने गॅस पुरवठा करायचा याचे आदेश स्पष्ट करण्यात आले आहेत. शाळा, अंगणवाडी तसेच शासकीय खाणावळींना 100% गॅस पुरवठा करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.
सरकारने गॅस वितरणाबाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे. याअंतर्गत कोणत्या भागात आणि कोणत्या पद्धतीने गॅस पुरवठा करायचा याचे आदेश स्पष्ट करण्यात आले आहेत. शाळा, अंगणवाडी तसेच शासकीय खाणावळींना 100% गॅस पुरवठा करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. सरकारच्या आदेशानुसार, या संस्थांना गॅस पुरवठ्याचा दररोज अहवाल सादर करण्याचे गॅस एजन्सींना आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय, उपहार व्यवसायांना 70% आणि औषध उद्योगाला 50% गॅस पुरवठा करण्याचेही आदेश जाहीर करण्यात आले आहेत. या नियमावलीचा उद्देश गॅस तुटवड्यामुळे उद्भवलेल्या समस्यांवर नियंत्रण ठेवणे आणि शालेय, सामाजिक तसेच औद्योगिक गरजा सुरळीतपणे भागवणे हा आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गॅस वितरण व्यवस्थेत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Published on: Mar 14, 2026 02:57 PM
Follow Us
