Gulabrao Patil : पंतप्रधान मोदींचं कौतुक करत गुलाबराव पाटलांची शेरोशायरी
Gulabrao Patil On India Pakistan Conflict : राज्यात, देशात आणि जगात आपली वट आहे असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सैन्याचं कौतुक केलं आहे.
राज्यात, देशात आणि जगात आपली वट आहे असं गुलाबराव पाटील यांनी म्हंटलं आहे. तुम एक को मारोगे तो हम सौ को मारेंगे, मोदींनी दाखवून दिलं, असं देखील गुलाबराव पाटलांनी यावेळी बोलताना म्हंटलं आहे. भारत पाकिस्तान तणाव परिस्थिती आणि ऑपरेशन सिंदूरवर भाष्य करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं, यावेळी त्यांनी हे भाष्य केलं.
पुढे बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, चारी मुंड्या चित करून पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम मोदींनी केलं आहे, असं म्हणत गुलाबराव पाटलांनी सैन्यदलाचं देखील कौतुक केलं आहे. तुम एक को मारोगे तो हम सौ को मारेंगे, असं मोदींनी म्हंटल होतं ते दाखवून दिलं. तारा है ताराही रहेगा, सुरज हमेशा चमकता रहेगा. काश्मीर हमारा था, हमारा ही रहेगा, असं देखील यावेळी त्यांनी म्हंटलं.