Asaduddin Owaisi : पाकिस्तानी ऑफिशियल भिखमंगे; ओवेसींनी पुन्हा पाकिस्तानची लक्तरं काढली
Asaduddin Owaisi On Pakistan : पाकिस्तान आयएमएफकडून 1 अब्ज डॉलरचं कर्ज घेत आहे, त्यावरून खासदार असदुद्दीन ओवेसी टीका केली आहे.
पाकिस्तानी लोक हे ऑफिशियली भिखमंगे आहेत अशी टीका करत एमआयएमचे पक्षप्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानची लक्तरं काढली आहेत. भारतासोबतच्या वाढत्या तणावाच्या आणि युद्धजन्य स्थितीत पाकिस्तान आयएमएफकडून 1 अब्ज डॉलरचं कर्ज घेत आहे, त्यावरून त्यांनी ही टीका केली आहे. आयएमएफमध्ये भारताने पाकिस्तानला हे कर्ज देण्यास नकार दर्शवला होता. इतकंच नाही तर हा पैसा पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसण्यासाठी वापरेल असा इशारा देत यासाठी घेतलेल्या निवडणूक प्रक्रियेला देखील भारताने उपस्थिती दर्शवली नव्हती. तरीही एवढ्या मोठ्या रकमेचे कर्ज मंजूर करण्यात आलेले आहे. त्यावर खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीवरून चांगलीच टोलेबाजी केली.
यावेळी बोलताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, ‘पाकिस्तानवर आयएमएफकडून कर्ज घेण्याची वेळ आली, तर त्यांनी 75 वर्ष काय केलं? हे लोक भिखमंगे आहेत. ऑफिशियल भिखमंगे आहेत. तुम्हाला कोणी एवढं मजबूर केलं आहे, आयएमएफकडून 1 अब्ज डॉलरचं कर्ज घेण्यासाठी? ते आयएमएफ नाही तर आंतरराष्ट्रीय दहशतवादी निधी पाकिस्तानला देत आहे, अशी टीका करत ओवेसी यांनी पाकिस्तानची सगळी लक्तरं काढली आहेत.

ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याचा प्रश्न विधीमंडळात गाजला

गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये उसळला भक्तांचा महासागर

शिक्षकांच्या आंदोलनाला यश, महाजनांची मोठी घोषणा; येत्या 8 दिवसांत...

पावसाचा कहर, पूर परिस्थिती आणखी बिकट; चंद्रपूरात उद्या सुट्टी जाहीर
